7th pay commission : खुशखबर… सातवा वेतन आयोग थकबाकी शासन निर्णय दि.24/5/2023

7th pay arrears : निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२३ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

सातवा वेतन आयोग थकबाकी अशी मिळणार

सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्याची रक्कम माहे जून, २०२३ च्या च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.

i) भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या र्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी. 

(ii) जे कर्मचारी (भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह) दिनांक १ जून २०२२ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील, अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या उर्वरीत हप्त्यांची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी.

२. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या ४ थ्या हप्त्यांच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ जुलै २०२२ पासून व्याज अनुज्ञेय राहील.

3. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम २० फेब्रुवारी, २०१९ मधील परिच्छेद क्र. १४ मधील तरतूदी प्रमाणे काढता येणार नाही.

सातवा वेतन आयोग थकबाकी शासन निर्णय येथे पहा

सातवा वेतन आयोग थकबाकी

%d