crop insurance list : ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये सोयाबीनचा 25 % पिक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Crop insurance yadi
राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे 2148 कोटी रुपये मंजूर झाले असून यातील 942 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.परंतु काही ठिकाणी पिकविमा कंपनीने काही शेतकऱ्यांना प्रिमीयम पेक्षाही कमी पैसे दिले आहेत.काहींच्या खात्यात चक्क 60,80,90 अशी रक्कम जमा झाली.
परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी 4 लाख 80 हजार 486 पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत,त्यासाठी परभणी जिल्ह्यातील 3 लाख 14 हजार 205 शेतकऱ्यांना 66 कोटी 50 लाख रुपये जमा होणार आहे
हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईसाठी 4 लाख 47 हजार 842 पूर्वसूचना पीकविमा कंपनीकडे दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी 3 लाख 66 हजार शेतकऱ्यांना 96 कोटी 35 लाख रुपये एवढी विमा परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील 3 लाख 70 हजार शेतकरी बांधवांसाठी 398 कोटी रुपये निधी वितरणासाठी प्राप्त झाला आहे.वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 64 कोटी 9 लाख रुपये विमा निधी वर्ग करण्यात आला आहे.
सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी येथे पहा