DCPS amounts संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.23/3/2023

DCPS amounts : जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेची कार्यपध्दती शासन निर्णयान्वये विशद केली आहे.

Dcps amounts transfer updates

परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी शासनाचा हिस्सा व व्याजासाठी सन २०२२-२३ मध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी विभागाने केलेली पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली होती.

सन २०२२-२३ मधील मंजूर तरतूदीच्या ५०% रक्कम अदा करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.आता सदर लेखाशीर्षाखाली उर्वरित निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

NPS latest news

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी मंजूर तरतूदच्या ५०% रक्कम रु.३४९,४७,०५,५००/- (रुपये तीनशे एकोणपन्नास कोटी सत्तेचाळीस लाख पाच हजार पाचशे फक्त) इतका निधी प्राप्त झाला आहे.

हे पण पहा ~  Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प, वाचा महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर

अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे आयुक्त,शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना खालील विवरणपत्रानुसार वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

डिसीपीएस रक्कम जमा होणारे जिल्हे व शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d