Employees retirement age : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृती वयामध्ये होणार वाढ! पहा सविस्तर कारणे

Retirement age : भारतात सध्या कमाल निवृत्तीचे वय 58 ते 65 वर्षे आहे.ही तफावत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांपासून ते सरकारी क्षेत्रापर्यंत आहे.आपण युरोपियन युनियनबद्दल बोलायचे झाले तर तेथे निवृत्तीचे सरासरी वय 65 वर्षे आहे.युरोपमध्ये डेन्मार्क,इटली आणि ग्रीसमध्ये निवृत्तीचे वय 67 वर्षे आहे आणि अमेरिकेत 66 वर्षे आहे.

State Employees Retirement Age

केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृतीचे वय केंद्र सरकार व भारतीय प्रशासनिक सेवांप्रमाणे 60 वर्षे करण्याबाबात राज्य कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत आहे.
या साठी सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत अभ्यासासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्ती सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय समिती नियुक्त केली होती.

Government employees updates

राज्याच्या सामान प्रशासन विभागाकडून प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला होता,पण या प्रस्तावाला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी विरोध केल्याने सदर प्रस्ताव अद्याप पर्यंत प्रलंबितच आहे.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्य सरकारी बऱ्याच दिवसांपासून होत आहे.या बाबतीत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

निवृत्तीचे वय ६० वर्षे आवश्यकता

  • दरवर्षी अतिरिक्त कार्यभाराच्या ताणाने शेकडो कार्यक्षम अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.
  • सध्या दर वर्षी ३ टक्के म्हणजे जवळपास २५-३० हजार इतकी निवृतीने होणारी रिक्त पदांची वाढ तातडीने थांबवणे गरजेचे आहे.
  • सद्यस्थितीत अकार्यक्षम आणि संशयातीत सचोटी या कारणास्तव वय वर्षे ५० आणि ५५ या दोन्ही कालांत पुनर्विलोकन करून सक्तीने सेवानिवृत्ती देता येते.
  • स्वतःलाच काम करण्याची इच्छा नसेल, अशा व्यक्तींना स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा पर्याय खुला आहे.
  • सध्या रिक्त जागांची संख्या २.५ लाखाच्या पुढे पोहोचली आहे. गेल्या सात आठ वर्षात नवीन नियुक्तीचे प्रमाण अत्यल्प आहे.
  • त्यामुळे अतिरिक्त कार्यभार देण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे कामास योग्य न्याय मिळत नाही आणि जनतेची कामेदेखील समाधानकारक होत नाही.

DCPS-NPS धारक कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण होणार!  पहा शासन परिपत्रक निर्गमित

अर्जित रजा रोखीकरण

%d