Employee’s Service book : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक e-HRMS प्रणाली द्वारे डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक होणार डिजिटल
सदर e-HRMS प्रणाली https://115.124. 119,298 या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असून राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती E – HRMS प्रणालीवर भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत. शE – HRMS प्रणालीबाबत NIC मार्फत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
सर्व विभागांत तसेच त्यांच्या अधीनस्त क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तकविषयक माहिती e-HRMS प्रणालीमध्ये भरण्याची कार्यवाही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने सर्व मंत्रालयीन विभागांना तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहे.
Employees Digital Service Book
सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की,नव्याने नियुक्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची सेवा पुस्तके e-HRMS प्रणालीमध्येच भरण्यात येणार आहे.
आधार पॅन कार्ड लिंक नसल्यास 10 हजार दंड,
ज्या नवनियुक्त अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके -HRMS मध्ये भरणे शक्य झालेले नाही / होणार नाही त्यांची सेवा पुस्तके त्यांच्या सेवा नियमित करताना कोणत्याही परिस्थितीत e-HRMS प्रणालीमध्ये भरण्यात यावीत.
सर्विस बुक भरण्यासंदर्भात सुचना
- सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या विभागातील तसेच त्यांच्या नियत्रंणाखालील कार्यालयांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबी e-HRMS प्रणालीमध्ये भरणेबाबत कार्यवाही करतील
- सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची सेवापुस्तके Scanning (Along with bookmarking) करुन e-HRMS प्रणालीवर अपलोड करण्याची कार्यवाही दि.३१/३/२०२३ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
- सर्व अधिकारी व कर्मचारी यांची सेवापुस्तके यापुढे e-HRMS प्रणालीवरच उपलब्ध होतील याची सर्व विभागांनी दक्षता घेईल.
कर्मचाऱ्यांना डिजिटल सर्विस बुकमळे मिळणार हे लाभ