Family pension : अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार!
शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की,दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्य:स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतूदी लागू राहतील.
कुटुंब निवृत्ती वेतन सानुग्रह अनुदान योजना
शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अंनियो-२०१७/प्र.क्र.२९/सेवा-४, दि.२९.०९.२०१८ अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे.सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी.
दिनांक ०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल.
Old pension scheme updates
कुटुंब निवृत्तिवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल.सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील.
कुटुंब निवृत्ती वेतनात कोणते फायदे होणार येथे पहा
Family pension scheme Maharashtra
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तिवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना २ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा.
DCPS/NPS latest updates
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व कर्मचान्यानी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्र.४ प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील.तसेच यापुढे शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे विकल्प शासन सेवेत नियुक्त झाल्यावर ८ दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील.
शासन असाही आदेश देत आहे की, जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचार्यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारासह लागू राहील.
आता NPS DCPS धारकांना मिळणार हे लाभ व शासन निर्णय येथे पहा