Dearness allowance : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु आहे. आणखी एका राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 16 % वाढ होणार आहे. आणखी एका राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळणार आहे.
महागाई भत्त्यात तब्बल 16 टक्के वाढ!
उत्तर प्रदेश सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 16 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. यासंदर्भात आदेश राज्य सरकार कडून देण्यात आला आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता जोडला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.
Dearness allowance hike 2023
उत्तर प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 16 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या DA allowance वाढीचा लाभ पाचव्या वेतन आयोग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना ४१२% दराने एकुण महागाई भत्ता म्हणून दिली जाणार आहे.
महाराष्ट्र कर्मचारी डीए वाढीच्या प्रतिक्षेतच!
भारतातील जवळपास बहूसंख्य राज्यांनी आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलेली असताना महाराष्ट्रात सध्या महागाई भत्ता 38% प्रमाणे लागू आहे.राज्य सरकारी कर्मचारी अजून सुद्धा DA वाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अजून पर्यंत महागाई भत्त्याच्या दरात 4% वाढ करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता 42 % दराने देय केलेला आहे.
महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा या दिवशी वाढणार महागाई भत्ता