Government employees : जुनी पेन्शन योजना संदर्भात राज्यभरात चर्चा सुरु झाली असतााना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.नवीन नियमानुसार काही प्रकरणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी त्याला दिली जाणार नाही.
Pension scheme new update
नवीन नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी,न्यायालयीन चौकशी किंवा कारवाई प्रलंबित असल्यास त्याची माहीती संबंधित विभागाला देणे आवश्यक असणार आहे.या प्रकरणांमध्ये कर्मचारी हा दोषी आढळून आल्यास
पेन्शन व ग्रॅच्युइटी थांबवण्याचे अधिकार हे संबंधित कार्यालय प्रमुखाला देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता कामाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच इतर प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी पासून प्रकरण संपेपर्यंत किंवा कायमचे वंचित राहावे लागणार आहे.कर्मचारी वर्ग आता आणखी काटेकोरपणे आपली कर्तव्य बजावतील असे जाणकार सांगत आहेत.
सध्यास्थितीला केंद्र सरकारने साठी हा निर्णय घेतला असून लवकरच महाराष्ट्रात हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जाऊ शकतो.
अशा प्रकारच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. सध्या तरी याबाबत राज्य सरकारने कोणतीच औपचारिक अशी घोषणा केली नाही.
केंद्र सरकारने ही नवीन नियमावली स्विकारली असल्याने राज्य शासन देखील ही नियमावली स्वीकृत करेल आणि अशा राज्य कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन तसेच ग्रॅच्युटी पासून वंचित ठेवले जाऊ शकते असे सांगितले जाते आहे.
1 thought on “Government employees : पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात मोठी बातमी! आता या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन व ग्रॅच्युइटी”