ITR filling : इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत ऑनलाइन आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू केली नाही.सध्या ज्यांचे TCS चे कोणतेही पैसे कापले जात नाहीत व 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न आहे ते लोक हा फॉर्म भरू शकतात.
कोणी कोणता फॉर्म भरावा ?
- 1 – ज्यांचे 50 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये पगार -पेन्शनमधून उत्पन्न , घराची मालमत्ता यांचा समावेश आहे.
- 2 – मालमत्तेमधून उत्पन्न कामावतात त्यांच्यासाठी
- 3 – व्यवसायातून उत्पन्न कमवणाऱ्यांसाठी
- 4 – व्यावसाय संबंधित उत्पन्न ,हिंदू अविभक्त कुटुंब आणि फर्म हे हा फॉर्म भरू शकतात.यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असले पाहिजे.
- 5,6 फॉर्म 5 आणि 6 हा LLP किंवा व्यवसायासाठी आहे.
- 7 हा ट्रस्ट फाइल करू शकतात.
ITR फॉर्म कसा भरावा ?
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण उत्पन्नानुसार, फॉर्म-16 सोबत जुळवून भरावा लागेल.यामध्ये एकूण उत्पन्न, एकूण बचत आणि टीडीएसची माहिती भरायची आहे.
फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तो स्कॅन करून आयकर पोर्टलवर अपलोड करावा किंवा ई व्हेरिफिकेशन करावे लागेल,जेव्हा तुम्ही त्याची पडताळणी कराल तेव्हाच ITR फॉर्म भरलेला मानला जाईल.आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.