ITR Rebate : आपण जर आयटीआर भरत असतो.कर बचतीचे विविध पुरावे देत असतो पण यंदा मात्र ITR भरताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता.
ITR Rebate latest rules
इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही जण घरभाडे पावती देतात. काही जण अनेकदा बनावट घरभाडे पावती जोडतात, पण आता असे करणे खूप महागात पडू शकते, कारण आता ITR भरताना, बनावट घरभाडे पावती असल्यास आयकर विभाग थेट नोटीस पाठवू शकते.
तुम्ही जर Salaried Employees असाल घरभाडे भत्त्याचा लाभ उठवू शकता, पण HRA मधून आयकर बचत केवळ जुन्या कर व्यवस्थेतच मिळते.नवीन कर व्यवस्थेत कर सवलतीसाठी चा लाभ घेता येत नाही.
Income tax new slab 2023
प्राप्तिकर अधिनियमाची कलम 10 (13A) अंतर्गत सवलत मिळते. च्या माध्यमातून कर बचत करता येते.पण त्यासाठी काही अटी आहेत.मेट्रो शहरात मुळ पगाराच्या 50 % हिस्सा तर नॉन मेट्रो शहरात पगाराच्या 40 % हिस्सा घरभाडे भत्ताचा असतो.वार्षिक घरभाडे 10% रक्कम कमी झाल्यानंतर उरलेली रक्कम घरभाड्याचा भाग आहे.
घरभाडे आयकर सवलत घेताना अशी घ्या काळजी
सरकारी नोकरदाराला 1 लाख रुपयांपर्यंतची च्या माध्यमातून आयकर बचत करता येते. च्या माध्यमातून कर सवलत मिळवण्यासाठी सर्वात अगोदर रेंट ॲग्रीमेंट करणे आवश्यक असते.करारामध्ये मासिक भाडे,कराराचा कालावधी आणि अंतिम मुदत,खर्च याची माहिती द्यावी लागते.
घरभाडे करारनामा 100 वा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असणे आवश्यक आहे.जर वार्षिक घरभाडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर घर मालकाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
टॅक्स बसत नसला तरी भरा ITR मिळतात हे फायदे