Mahashivaratri 2023: पहा महाशिवरात्री शुभ मुहूर्त, साहित्य,पुजा विधी आणि महत्व

Maha Shivratri : महाशिवरात्र पुजा विधी करताना भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा असतो. अभिषेक करताना पहिल्यांदा जल, मग पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावा.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून आपल्या शक्तीनुसार निर्जल किंवा निष्फळ व्रत करावे.

1. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालावे.

2. त्यानंतर केसरच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावावा.

3. यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा.

4. भगवान शंकराला  धतुरा, बेलपत्र,कमळ गट्टे, पाच प्रकारची फळे, गोड सुपारी, उसाचा  रस, फुले आणि काही धन अर्पण करावे.

5. यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी.

6. वरील गोष्टी अर्पण करताना ॐ नमो भगवते रूद्राय, ॐ नमः शिवाय असा जप करावा.

महाशिवरात्र 2023 पुजा 

या दिवशी शिवपुराणाचे पठण आणि महामृत्युंजय मंत्र किंवा शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा जप ओम नमः शिवाय करावा. यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्र जागरणाचाही नियम आहे.

शास्त्रीय विधीनुसार शिवरात्रीची पूजा ‘निशिथ काळात’ करणे उत्तम. मात्र, भाविकांना त्यांच्या सोयीनुसार रात्रीच्या कोणत्याही चार प्रहरांमध्ये ही पूजापूज

%d