Old pension : शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन,मृत्यू योगदान देण्याचा निर्णय मंजूर येणार आहे.
निवृत्ती वेतन योजना महाराष्ट्र
मयत कर्मचारी कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याचा आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला असल्याच्या मिडीयात बातम्या आहेत.मयत कर्मचारी कुटुंबीयांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या 8-10 वर्षातील लढ्याचे हे यश आहे.
हजारो मयत कर्मचारी कुटुंबियांना वाहिलेली ही खरी श्रद्धांजली आहे.या निर्णयाचे मनस्वी स्वागत करण्यात येत आहे.सरकारने हा निर्णय घेतला असला तरी, हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपातील मागणी नाही.
Government employees news
सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन,मृत्यू योगदान बाबत निर्णय घेण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना नागपूर विधिमंडळ अधिवेशना वरील पेन्शन दिंडी दरम्यान देण्यात आलेले होते.खरे तर हे या आगोदर होणे अपेक्षित होते.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
14 मार्च संपातील government employees मागणी सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा ही आहे. त्यावर सरकारी कर्मचारी ठाम आहोत. त्यामुळे संप सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे.
1 thought on “Old pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!”