Old pension : फॅमिली पेंशन-ग्रॅच्युटी चा शासन निर्णय अखेर निर्गमित GR- 31 मार्च 2023

Old pension : फॅमिली पेंशन-ग्रॅच्युटी चा शासन निर्णय अखेर निर्गमित GR- 31 मार्च 2023,NPS DCPS धारकांना सेवेत असतांना मृत्यू आल्यास जुनी पेंशन पेन्शन योजना चे लाभ

NPS DCPS धारकांना मिळणार हे लाभ

1) सेवेत असतांना मृत्यू आल्यास जुनी पेंशन चे लाभ-

फॅमिली पेंशन(जुनी पेंशन) आणि सोबत डेथ ग्रॅच्युटी (मृत्यू उपदान) लाभ.

2) सेवेत असतांना जख्म/इजा/आजारपण इत्यादिमुळे सेवा समाप्त झाल्यास रुग्णता निवृत्तीवेतन (जुनी पेंशन) आणि सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी(सेवा उपदान) लाभ..

3) सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर पूर्वीप्रमाणे रिटायरमेंट ग्रॅच्युटी (सेवा उपदान..)

येथे उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली बक्षीस रक्कम आहे, ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून आहे..  

उदा- 1 वर्ष च्या आत सेवा – असल्यास मिळणारे उपदान- 

 अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम.

1 वर्ष ते 5 वर्ष सेवा- मिळणारे उपदान- अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम,

5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान= अंतिम वेतनाच्या 12 पट

11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान = अंतिम वेतनाच्या 20 पट… 

20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान = अंतिम वेतनाच्या 33 पट ₹ (कमाल मर्यादा 14 लाख..₹) 

तरी मयत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खालील अटी ना अधीन राहून वरील लाभ मिळतील.

ज्यांना 10 लाख रु सामुग्रह अनुदान मिळाले आहे, त्यांना ती रक्कम परत करावी लागणार आहे.

NPS/DCPS मधील जमा रकमे पैकी शासन अंशदानाची रक्कम व शासन अंशदान रकमेवरील वाढीव व्याज / परतावा शासनास परत करावा लागणार आहे.

वरील रकमा समायोजित केल्या जातील..

तथापि कर्मचाऱ्यांचा 10% कर्मचारी हिस्सा व कर्मचारी हिश्यावरील व्याज ही रक्कम कर्मचारी कुटूंबा कडेच राहील.

कुटुंब निवृत्ती वेतन शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

शासन निर्णय

%d