Old pension updates : सखोल चर्चेनंतर सर्वानुमते अनेक निर्णय घेण्यात आलेल्या निर्णयांचा समितीला दिलेल्या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
समितीच्या अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातील ठळक मुद्दे :-
- नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात यावी.
- 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर भरती झालेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
- केंद्र सरकारने,जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन नियम,1972 अंतर्गत जुन्या पेन्शन योजनेच्या कक्षेत आणले पाहिजे.
- NPS मधील कोणत्याही सुधारणा कर्मचार्यांसाठी उपयोगी होणार नसून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी ही मागणी कधीच केली नव्हती.
- राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना GPF योजनेचा लाभ देण्यात यावा तसेच जमा झालेले कर्मचारी योगदान परताव्यासह केंद्र सरकारने GPF खात्यात जमा करावा.
- समितीने विहित कार्यक्षेत्रात काम करावे,असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.