Old pension : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना “जुनी पेन्शन योजना” लागू करा’ या मागणीसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी-शिक्षक 14 मार्च 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संपावर जाणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
राज्यात काही दिवसात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार आहेत.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील इतर सरकारी व निमसरकारी कर्मचारी संपामध्ये सामील होणार आहेत.
Juni pension scheme
मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचे नेतृत्व करीत असल्यामुळे, समन्वय समितीच्या वतीने सर्वांना जुनी पेन्शन “Juni pension scheme” लागू करा ही प्राथम्याची मागणी व इतर प्रलंबित मागण्यांचा सांप्रत राज्य शासनाने लगेच निर्णय घ्यावा या आग्रहासाठी,नाईलाजाने, राज्यभरातील सर्व कर्मचारी शिक्षक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जातील अशी घोषणा समन्वय समितीने केली आहे.
Old pension new updates
राज्यातले 17 लाख कर्मचारी 14 मार्च पासून संपावर जाणार आहेत.राज्य सरकारी कर्मचारी संघटनांची राज्यस्तरीय बैठक औरंगाबाद मधल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडली.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातले सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती सरकारी, निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
महागाई भत्ता 42 % वाढ संदर्भात मोठी बातमी येथे पहा