Old pension scheme : जुन्या पेन्शन योजनेचे फायदे माहिती आहे का? NPS मध्ये मिळत नाही एकही लाभ नाही

Old pension scheme : 1982 च्या फॅमिली पेन्शन योजनेत सेवानिवृत्त होत असताना एका निश्चित निवृत्ती वेतनाची (सेवेच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या 50 टक्के ) शाश्वती देण्यात येते.त्यानुसारच महिन्यातील निवृत्तीवेतन सुद्धा निश्चित केले जाते.

भविष्य निर्वाह निधी (GPF)

1982 च्या निवृत्ती वेतन योजनेत भविष्य निर्वाह निधी (GPF) ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जुन्या निवृत्ती वेतन योजनेत भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) वर निश्चित दराने व्याज दिले जाते.भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) योजनेत वर्षातून एकदा जमा रक्कमेतून परतावा- ना परतावा रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कर्मचारी मृत्यू नंतर मिळणारे लाभ

कर्मचारी / निवृत्तीवेतन धारक हयात नसताना कुटुंबाला पूर्ण संरक्षण देण्याचे काम 1982 – 1984 च्या फॅमिली पेन्शन योजनेने केले आहे.जुन्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यावर खालील लाभ मिळतो.

अ) कुटुंब निवृत्ती वेतन

ब) विकलांग अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन

क) अंशराशीकरण

ड) उपादान

इ) भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेली संपूर्ण रक्कमा वारसांना मिळतात.

वेतन आयोग व महागाई भत्ता वाढ (Pay Commission DA hike)

जुन्या निवृत्ती वेतन योजनेत प्रत्येक सहा महिन्यांनी वाढलेल्या महागाईचा अंदाज घेऊन ठरलेल्या सूचकाप्रमाणे महागाईतील वाढ लक्षात घेऊन महागाई भत्त्याच्या स्वरुपात दिला जातो.तसेच दर 10 वर्षांनी वेतन आयोगाचे निर्णयही लागू करून त्यानुसार लाभ दिला जातो.

आता यांना मिळणार जुनी पेन्शन योजना

जुनी पेन्शन

%d