Old Pension strike : जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावरुन राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी (Maharashtra Government Employees) संपावर ठाम आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संटनेने याबद्दल इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या 14 मार्चला 14 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्र राज्य अवर सचिव यांचे बैठकीचे पत्र
सरकारी-निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्यांबाबतचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेले सोबत जोडलेले निवेदन कृपया पहावे. सदर निवेदनात राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या मागण्यांसाठी दि १४.३.२०२३ रोजी पासून बेमुदत संप आंदोलन पुकारणार असल्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
संघटनेच्या उपरोक्त निवेदनातील प्रलंबित मांगण्यांबाबत मा. मुख्य सचिव महोदय यांचे समवेत आज दिनांक १०. ३.२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता, बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ठरल्या नुसार सदर संघटने सोबत सोमवार दिनांक १३.०३.२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. उक्त निवेदनातील विविध मागण्यांमधील आपल्याशी संबंधित मागणीबाबतच्या वस्तुस्थितीसह कृपया सदर बैठकीच्या वेळी आपण उपस्थित रहावे, अशी आपणास विनंती पत्रात करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन केले की “मी पूर्ण दिवस,फक्त एक नाही,तर चार दिवस लागले तरी सर्व कर्मचारी युनियनसोबत बोलायला तयार आहे. मी कर्मचारी संघटनांना विनंती करणार आहे की, त्यांनी इगो इशू न करता यावर चर्चेच्या माध्यमातून काय टप्पे ठरु शकतात, काय मार्ग निघू शकतो यावर मार्ग काढूया.संपाची नोटीस दिलीय,आपण सगळ्यांनी विनंती केली पाहिजे की, संपावर जाऊ नका”
Old Pension Maharashtra updates
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर सगळ्या संघटनांशी बोलायला तयार आहे केवळ त्यांनी भावनिक होऊ नये.त्यांनी टेक्निकल बाजू समजून घ्यावी. त्यांनी सरकारची बाजू समजून घेतली की हा विषय संपेल. विरोधी पक्षाने इगो विषय करु नये.(Old Pension Maharashtra updates)
खुशखबर.. महागाई भत्ता 42% वाढ प्रस्ताव तयार! पहा किती वाढणार पगार
एका संघटनेने संपाची नोटीस दिली आहे.मी त्यांना आव्हान करतो की, आम्ही चर्चेला तयार आहोत.लोकशाहीत कर्मचारी आदोलन करत आहेत आणि त्यामुळे विरोधकांना आनंद होत असेल तर हे योग्य नाही.भविष्यात राज्याची अर्थव्यवस्था योग्य राहावी यासाठी सर्वांनी बाबी समजून घ्यायला हव्यात.
अवर सचिव यांचे बैठक संदर्भात पत्र येथे पहा
1 thought on “Old pension strike : 14 मार्च आंदोलनचा धक्का.. मुख्य सचिव यांचे बैठकीचे निमंत्रण तर, देवेंद्र फडणवीस याचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन”