Old pension scheme : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जुनी पेन्शन योजना हा कळीचा मुद्दा ठरला होता.त्याचा परिणाम सुध्दा महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकांवर सुद्धा झालेला आढळून आलेला आहे.मागील काळात सरकारने जुनी पेन्शन योजना बाबत सकारात्मकता दर्शवली असतानाच आता एक मोठी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया हाऊसनेमहाराष्ट्र मंत्रालयात विचारणा केली असता वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,तूर्तास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला या मागणी संदर्भात आढावा घेण्यासाठी कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“जुनी पेन्शन योजना” सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी शासन सकारात्मक म्हटले जाते आहे.पण निदान या योजनेबाबत आढावा तरी आवश्यक आहे.
या योजनेबाबत वित्त विभागाकडून कोणताच आढावा घेण्यासाठी सांगितले गेले नसल्याची माहिती थेट मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.old pension scheme लागू करणे शासनाच्या खरंच विचाराधीन आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
juni pension yojana Maharashtra
जाणकारांच्या मते juni pension yojana लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याच दाखवणे हा निवडणूक प्रचाराचा एक भाग होता असे सांगत आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी योजनेसाठी सकारात्मकता दर्शवली असल्याने ज्या काही राज्य कर्मचाऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या त्या पुन्हा एकदा मावळल्या आहेत.
7 लाखांपर्यंतच उत्पन्न टॅक्स फ्री,पण 3 लाखांपासून 5% टॅक्स? काय आहे प्रकार? पहा सविस्तर