OpsOPS Strike leave : दि.28 मार्च 2023 रोजी राज्य शासनाने काढलेल्या निर्णयातील संप कालावधी हा ‘असाधारण रजा’ या ऐवजी’देय रजा’ करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.संबंधित शासन निर्णय अजूनपर्यंत निर्गमित झाला नाही. अशा वेळी कोषागार कार्यालय,सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवार,सोलापूर यांच्या कडून दि.06/04/2023 परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
संप काळातील वेतन निघणार पण
दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या संप कालावधीतील 07 दिवसांचा कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक- संघटना 1 522/प्र.क्र.36/ 16-अ दिनांक 28 मार्च 2023 नुसार संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले हाते, त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात येणार असे नमूद केलेले होते.
पण आता माहे मार्च 2023 चे वेतन अदा करणेबाबत संप कालावधीतील 07 दिवसांचे संपामध्ये सहभागी कर्मचारी यांचे बाबत पूर्णत वेतन अदा करण्यात येणार आहे.
एप्रिल महिन्यात होणार वसुली!
दि.28 मार्च 2023 चे शासन निर्णयाच्या अनुषंगाने सुधारित शासन आदेश निर्गमित न झाल्यास सदर संप कालावधीतील 07 दिवसांचे वेतन हे विना वेतन म्हणून माहे एप्रिल 2023 च्या वेतनातून एकरकमी कपात करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
याची कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी नोंद घेऊन सदर परिपत्रकामध्ये नमूद कार्यवाही बाबत (एकरकमी कपात करण्यास हरकत नाही) नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे अंदोलन काळात आश्वासन
दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी समन्वय समितीने मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये अशी मागणी केली.
संप मागे घेतेवेळी दिलेल्या आश्वासनांनुसार संप काळातील कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.पण अद्याप तसे पत्रक अजून आलेले नाही.
संप काळातील वेतन रजा संदर्भात आत्ताची महत्त्वाची अपडेट्स समोर