RTE admission 2023 : बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 25% मोफत प्रवेश प्रक्रिया

RTE Act 2010 : भारतीय राज्यघटनेच्या ८६ व्या घटनादुरुस्तीने (२००२) आर्टिकल-२१ अ समाविष्ट करण्यात आले.त्या अंतर्गत ६ ते १४ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना जवळच्या सरकारी शाळेत नि:शुल्‍क आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

RTE admission 2023 Qualification 

मोफत शिक्षणाचा अर्थ असा आहे की, मुलांचे पालक शाळेची फीस, मुलांचा गणवेश व दफ्तरासाठी कोणताही खर्च करणार नाहीत. त्याचबरोबर या कायद्यानुसार खासगी शाळेत २५ टक्के मुलांचा प्रवेश कोणतेही शुल्क न घेता केला जाईल.

RTE admission 2023 Qualification

  • आर्थिक दृष्ट्या मागास व डिसअडवांटेज ग्रुप (जसे अनुसूचित जाती (SC) जमाती (ST)आणि अनाथ) यांना सामील करण्यात आले आहे.
  • RTE admission 20230Qualificatio
  • हा कायदा वय वर्ष ०६ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे.
  • जे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुले आहेत. ते खासगी शाळेत २५ टक्के राखीव कोट्यातून शाळा प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
  • ज्या कुंटूंबाचे वार्षिक उत्पन्न साडे तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे ते आरटीई नियमांतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.
  • अनाथ, बेघर, दिव्यांग मुले, ट्रांसजेंडर, एचआयव्ही संक्रमित मुले आणि प्रवासी श्रमिकांची मुले आरटीई अधिनियमांतर्गत शाळा प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील मुलेही आरटीई अंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत.

RTE Admissions 2023 शासन निर्णय व अधिक माहिती येथे पहा

शासन निर्णय

टिप :- आपल्या मुलांना आरटीई अंतर्गत मोफत इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी जवळच्या शाळेत अर्ज करता येतो

%d