Employee’s Service book : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तक बाबी ऑनलाईन भरण्याबाबत शासन निर्णय

Service book : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तक e-HRMS (Human Resource Management System) प्रणाली विकसित करण्यात आली असून या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येणार आहेत.

सरकारी कर्मचारी सेवा पुस्तक

  • e-HRMS प्रणालीमध्ये सेवापुस्तकविषयक आवश्यक माहिती नियमित भरल्यामुळे खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत.
  • सर्व अधिकारी / कर्मचारी यांची सेवा पुस्तके वेळोवेळी अद्ययावत राहण्यास मदत होईल.
  • अधिकारी / कर्मचारी रजेवर आहेत त्यांचा अहवाल उपलब्ध होईल.
  • वर्षातून दोनदा (१ जानेवारी व १ जुलै) अधिकारी व कर्मचारी यांच्या खात्यात रजा (EL, CL. HPL) आपोआप जमा होतील.
  • ५०/५५ वर्षावरील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवांचे पुनर्विलोकन करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची यादी उपलब्ध होईल.
  • ज्या अधिकारी / कर्मचारी यांना स्थायीत्व प्रमाणपत्र प्राप्त नाही त्यांची यादी उपलब्ध होईल.
  • ज्या अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरू आहे त्यांची यादी उपलब्ध होईल.

👉सर्विस बुक ऑनलाईन करण्यासाठी येथे क्लिक करा👈

  • ज्या सरकारी अधिकारी / कर्मचारी यांची विभागीय चौकशी सुरू आहे त्यांची यादी उपलब्ध होईल.
  • सरकारी अधिकारी / कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत त्यांची 6 महिने आगोदर यादी उपलब्ध होईल.

डिजिटल सेवा पुस्तक नवीन शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय

%d