State employees : शासकीय अधिकारी/ कर्मचा-यांना “घरबांधणी अग्रिम” या प्रयोजनासाठी अनुदानाचे वाटप करण्यासाठी एकूण रु. २,४२,०५,७०८ /- अक्षरी रुपये दोन कोटी बेचाळीस लाख पाच हजार सातशे आठ फक्त) इतक्या निधीचे खालील अटींच्या अधीन राहून वितरण करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार घरबांधणी अग्रीम अनुदान!
नियंत्रक अधिकान्यांनी वित्त विभागाच्या प्रचलित शासन निर्णय व नियमावलीतील तरतुदींच्या अनुषंगाने प्रस्तावाची परिपूर्ण छाननी करावी तद्नंतरच निधी वाटपाचे आदेश काढून कोषागारातून रक्कम आहरीत करावी.
प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारास वितरीत करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबींची / कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे व ते स्थायी असल्याची पूर्ण खात्री करुन घ्यावी. तसेच अर्जदार सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्याच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या संपूर्ण अग्रिमाची व्याजासह वसुली होईल याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी.
Stete government employees
अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे अनुदान उपलब्ध असेपर्यंत या अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम कोषागारातून काढण्यात यावी. तसेच कोषागारातून रक्कम काढल्यानंतर ती रक्कम तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्यात यावी.
बांधकामाखाली असलेल्या सदनिकेच्या खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे अशा प्रकरणी अर्जदाराच्या घराचे बांधकाम विहित टप्प्यापर्यन्त पूर्ण झाल्याची खातरजमा नियंत्रक अधिकारी यांनी करावी व तद्नंतरच दुसऱ्या व तिसऱ्या टप्यासाठी अनुदानाच्या मागणीसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा.
ज्या अर्जदाराना ३ रा हप्ता / अंतिम हप्ता प्रमाणित करण्यात आला आहे. त्या अर्जदारांकडून नियमानुसार आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन नंतरच प्रत्यक्ष रक्कम प्रदान करण्यात यावी.
घरबांधणी अग्रीम अनुदान शासन निर्णय येथे डाऊनलोड करा