शिक्षक समायोजन शासन निर्णय
१. ठाणे / पालघर जिल्हा परिषदेमध्ये विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील २१८ (तसेच सदर आकडेवारीत शिक्षकांची बदली / पदोन्नती / सेवानिवृत्ती या कारणामुळे बदल झालेला असल्यास ती संख्या विचारात घेवून ) शिक्षकांच्या सेवा मूळ ठाणे/पालघर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याबाबत संदर्भ क्र. ३ येथे नमूद केलेल्या दि. २९.०२.२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १२ नुसार कार्यवाही करावी.
२. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करताना विकल्प विपरीत कार्यरत असलेल्या ज्या शिक्षकांना दि. ३१.०७.२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार दि. १०.०८.२०१७ पर्यंत दिलेले विकल्प बदलावयाचे असतील, त्यांनी सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसात विहीत नमुन्यातील सुधारीत विकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. सदर सूट ही ज्या शिक्षकांचे विकल्प विपरीत म्हणून ठाणे / पालघर जिल्ह्यात समायोजन झाले आहे त्यांनाच लागू राहील. ज्या शिक्षकांनी दिलेल्या विकल्पानुसार ठाणे / पालघर जिल्हयात समायोजन झाले आहे अशा शिक्षकांना विकल्प बदलाची संधी देण्यात येणार नाही.
३. उपरोक्त मुद्द क्र. २ मध्ये नमूद सुधारित विकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर, त्यानंतरच्या दोन आठवड्यांत पालघर जिल्ह्यामध्ये विकल्प विपरीत कार्यरत असणाऱ्या या शिक्षकांच्या सेवा मूळ ठाणे/पालघर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची कार्यवाही करावी.
४. नवनिर्मित पालघर जिल्हा परिषदेकडे शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही ही सन २०१६ मधील बिंदुनामावलीनुसार करण्यात आलेली आहे. या संदर्भात अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीनुसार सदर बिंदुनामावली प्रमाण मानून उपरोक्त अटी व शर्तीचे पालन करुन पालघर जिल्हा परिषदेमधील विकल्प विपरीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या जिल्ह्यात समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय येथे डाऊनलोड करा