विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज
1.विहीर योजना अंतर्गत खालील प्रमाणे अर्ज करावा.
सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर जा.
2. आता या ठिकाणी सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्या. नोंदणी करताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, तुमच्या बँकेची माहिती तसेच तुमच्या जमिनीची माहिती व इतर माहिती विचारण्यात येईल.
3. आता रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून किंवा आधार कार्ड च्या साह्याने लॉगिन करून घ्यायचे आहे.
4. या पोर्टल वर लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
5. आता तुमच्यासमोर विविध योजनांचे अर्ज दिसत असतील. त्यापैकी आपल्याला सिंचन व सुविधा या पर्यायांमध्ये विहिरी ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
6. संबंधित अर्ज व्यवस्थित भरा. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होईल.
सिंचन विहीर अनुदान ऑनलाईन अर्ज येथे करा