DA arrears calculator : राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दिनांक 1 जानेवारी, 2023 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 38 % वरून 42 % करण्यात आला आहे.
सदर महागाई भत्ता वाढ फरक दिनांक 1 जानेवारी, 2023 से दिनांक 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह माहे जून 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
महागाई भत्ता फरक कॅलक्यूलेटर
राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारने मोठी बातमी दिली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % नी वाढ केली आहे.DA आणि DR मधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू होईल.
सरकारने केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात 4% ने वाढ केली असून आता नवीन दर 42% करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत आता त्यांचा पगार खूप वाढला आहे. साधारणपणे असे दिसून येते की कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बेसिकमध्ये डीए जोडून काढले जातात.
इतर भत्ते देखील पगारात जोडले जातात आणि DA ची वाढ वाढल्याने,प्रवास भत्ता जोडल्यास अंतिम रक्कम वाढ होत असते.
महागाई भत्ता 42% वाढ मग पगारात होणारी वाढ व फरक येथे कॅल्क्युलेट करा
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ कधी मिळणार?