State Employee Retirement Age : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सरसकट 60 वर्षे करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी करत आहेत.14 मार्च रोजी पुकारलेल्या संपातील ही सुद्धा प्रमुख मागणी होती.
राज्य सरकार सेवानिवृत्त वय वाढवण्यास अनुकूल
शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवली जात आहेत.राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असल्याने राज्य शासनाकडून या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत समिती स्थापन
सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत अभ्यासासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्ती सनदी अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती.
राज्य सरकारचे एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी आहेत. त्यातील 3% कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात.आयएएस,आयपीएस आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय यापूर्वीच 60 करण्यात आले आहे.
Employee’s Retirement Age News
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. अशात कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे,अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.राज्य शासनाने हा निर्णय घेतला तर राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
‘या’ 5 प्रकारच्या व्यवहारावर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस
समिती स्थापन झाली आहे तेव्हा पासून निवृत्त झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा
समिती स्थापन करण्यात आली तेव्हा पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुध्दा लाभ मिळणार ही अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बाब आहे.