School holiday : महाराष्ट्र राज्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे.राज्यातील शाळांना खालील परिस्थितीमध्ये सुट्टी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.त्यानुसार खालील परिस्थितीमध्ये राज्यातील शाळा शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे.तर बघूया सविस्तर शासन परिपत्रक
School holiday updates
राज्यामधील काही जिल्हयामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शाळांतील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये- जा करण्याची गैरसोय होऊ शकते.
हवामान विभागाच्या राज्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळांना आवश्यकतेप्रमाणे सुट्टी घोषित करण्याबाबत यथोचित निर्णय घेण्या संदर्भात सुचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
शाळा सुट्टी शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा