7th Pay Arrears : राज्यातील बहुतांश जिल्हयांमधील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा फक्त पहिला हप्ता जमा झाला असून काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळाला आहे.
सातवा वेतन आयोग थकबाकी मिळणार!
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा,तिसरा आणि चौथा हप्ता मिळाला आहे पण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसरा व चौथा हप्ता देण्यासंदर्भात दिनांक ९ मे २०२२ व २४ मे, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला असताना सुद्धा सदर दोन्ही हफ्ते देणे प्रलंबित आहेत.
राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच इतर रकमा माहे एप्रिल २०२१ पासून प्रलंबित असून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनाही दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता जमा करण्याबाबत शिक्षक भारती व अन्य शिक्षक संघटनांकडून मागणी होत आहे.
Government employees 7th pay arrears
राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाची थकबाकी व माहे एप्रिल, २०२१ पासून प्रलंबित असलेल्या रकमा तात्काळ सेवानिवृत्त शिक्षकांना अदा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे अशी मागणी विधीमंडळात शिक्षक आमदारांनी लावून धरली होती.
शिक्षण मंत्री ना. श्री.दिपक केसरकर यांनी खालील प्रमाणे लेखी उत्तर दिले आहे. शिक्षण मंत्री म्हणाले की,अशा प्रकारची निवेदने प्राप्त होत आहेत.कोविड-१९ महामारीमुळे मागील काही वर्षात अपुरे अनुदान उपलब्धतेमुळे राज्यभरातील शिक्षकांना अंशराशीकरण / उपदान तसेच सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम प्रदान करता आलेली नाही.आता खालील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सातवा वेतन आयोग थकबाकी अनुदान वाटप संवर्ग व परिपत्रक येथे पहा