Education news : कमी पटसंख्या असलेल्या शाळेसंदर्भात ‘क्लस्टर शाळा’ नंतर आता ‘शिक्षण सारथी’ प्रयोगाची चर्चा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Education news : महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 4 हजार 89 शाळा आहेत.या शाळांमध्ये 8 हजार 226 शिक्षक आहेत आणि सुमारे 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.आता या 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमध्ये आणावे अशी चर्चा सुरू झाली झालीझाली असताना एक दुसरा ‘शिक्षण सारथी’ प्रयोग समोर येतो आहे.

क्लस्टर शाळा म्हणजे काय?

कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्र आणणारी एक शाळा म्हणजे ‘क्लस्टर शाळा’ होय.कमी पटसंख्येच्या शाळा असलेल्या भागातील काही अंतरावरील एक मध्यवर्ती शाळा निवडून त्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात.या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जातो.

पुणे जिल्हा परिषद क्षेत्रातील पानशेतजवळ हा पथदर्शी प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे असे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.आता राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने विचार सुरू केला आहे.

हे पण पहा ~  Teachers transfer : शिक्षकांच्या बदली संदर्भात नवीन धोरण जाहीर; आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदल्या रद्द! बघा नवीन धोरणाचा सारांश

‘शिक्षण सारथी’ म्हणजे काय?

आता 10 व 20 पेक्षाही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करता तेथील पूर्ण पगार घेणाऱ्या शिक्षकांना इतर शाळांची जबाबदारी देऊन त्या शाळांवर गावातीलच सेवानिवृत्त शिक्षकांची मासिक 20 हजार रुपये देऊन नेमणूक केली जाणार आहे.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

सेवा निवृत्तीनंतर सुद्धा स्वतःच्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा तो शिक्षक व्यवस्थित चालवू शकेतो,पटसंख्या कमी असल्याने तो शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी उत्तम प्रयत्न करेलकरेल. आयुक्त कार्यालयने नुकता असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला पाठवल्याची चर्चा आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना आता 5 दिवसाचा आठवडा

Five day’s weeks

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment