PM Kisan : पीएम किसान संदर्भात नवीन अपडेट्स! आता ‘या’ शिवाय नाही मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kisan : तुम्ही अजून पीएम किसान योजना संदर्भात नवीन अपडेट्स समोर आली असून आता काही शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील 14 वा हप्ता मिळणार नाही.केंद्र सरकारने PM-KISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी e-KYC बरोबर आणखी एक गोष्ट अनिवार्य केली आहे.

बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार

पीएम किसान लाभार्थीच्या आधार-सीडेड खात्याला सरळ बँक हस्तांतरण मिळते.ज्या शेतकऱ्यांकडे थेट लाभ हस्तांतरण (DBT) सक्षम असलेली किंवा आधार आणि NPCI शी लिंक केलेली बँक खाती नाहीत त्यांना अडचणी निर्माण होणार आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास (Aadhar Number) जोडणे बंधनकारक केले आहे.

बँक खाते आधार क्रमांकास जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ही सुविधा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. तेथील पोस्ट मास्टर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडून देण्यासाठी मदत करणार आहेत.

हे पण पहा ~  खुशखबर... केंद्राप्रमाने 42% दराने महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित दि.19/5/2023 || DA hike News

PM Kisan E-kyc last date

केंद्र सरकारकडून ई केवायसीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.पीएम किसान योजना अंतर्गत 10 मेपूर्वी E-kyc केले तरच पुढील 14व्या हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा पुढील हफ्ता मिळणार नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 10 मेपूर्वी E-kyc करणे बंधनकारक आहे.

PM Kisan Yojana 2023

पीएम किसान लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत वर्षभरात तीन वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये रक्कम मिळते.सामान्यतः पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान वितरित केला जातो.

पीएम किसान ईकेवायसी पीएम किसान वेबसाइटनुसार, “पीएमकिसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ईकेवायसी अनिवार्य आहे. OTP आधारित e-KYC PM KISAN पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित e-KYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

पीएम किसान योजना 14 हप्ता लाभार्थी यादी येथे पहा

पीएम किसान योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment