Dcps amounts : कर्मचाऱ्यांच्या NPS संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! आता पैशाची मिळाली मुभा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dcps amounts : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट सरकारी कर्मचारी/अधिकारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम “DCPS amounts” जमा करण्याची तसेच गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

निवृत्ती वेतन निधी विकल्प (Pension Fund)

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या महाराष्ट्रातील शासकीय अधिका-यांना यापुढे कोणत्याही एका निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकाची निवड करण्याचा विकल्प राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकासह खाजगी क्षेत्रातील निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकाच्या निवडीचा विकल्प उपलब्ध राहील.

NPS धारक आता वर्षातून एकदा आपला विकल्प बदलू शकतात.तथापि,सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकांची सध्याची योजना विद्यमान व नवीन सभासदांसाठी स्वयंचलितपणे (Default) उपलब्ध राहील.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

गुंतवणुकीच्या पध्दतीचे विकल्प

महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांकरिता गुंतवणूकीच्या पध्दतीचे विकला खालील प्रमाणे राहतील राहतील.

हे पण पहा ~  Free Cibil check : तुमचा सिबिल स्कोअर 2 मिनिटात मोबाईलवर पहा!तोही पुर्णपणे फ्री..

डिफॉल्ट योजना (Default Scheme) :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सभासद असलेल्या व नव्याने सभासद होणाऱ्या अधिकाऱ्यांकरीता सध्या अस्तित्वात असलेली सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील निवृत्तीवेतन निधी व्यवस्थापकांमधील गुंतवणूकीची योजना स्वयंचलितरित्या (Default) उपलब्ध राहील.

स्कीम जी (Scheme G) :- अधिका-यांना तुलनेने कमी जोखमीत व निश्चित परतावा हवा असल्यास त्यांना त्यांचा १००% निधी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा योजना – जी अंतर्गत विकल्प राहील.

👉राष्ट्रीय पेन्शन योजना जमा निधी बाबत अधिक माहिती येथे पहा👈

ऑटो चॉईस लाईफ सायकल निधी (Auto Choice Life Cycle Funds) :- अधिकाऱ्यांना अधिकचा परतावा हवा असल्यास त्यांना तुलनेने अति जोखमीच्या खालील जीवनचक्र निधी आधारीत योजना निवडण्याचा विकल्प राहील.

राष्ट्रीय पेन्शन योजना संदर्भात आजचा शासन निर्णय येथे पहा

शासन निर्णय

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

1 thought on “Dcps amounts : कर्मचाऱ्यांच्या NPS संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! आता पैशाची मिळाली मुभा…”

Leave a Comment