ITR Rebate : आयकर भरताना घरभाडे सुट घेत असाल तर सावधान! घ्या ही काळजी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITR Rebate : आपण जर आयटीआर भरत असणार. भरताना आपण विविध कर बचतीचे पुरावे देत असतो यंदा मात्र आयटीआर भरताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. 

ITR Rebate rules 2023

आयकर वाचवण्यासाठी, काही जण घरभाडे पावती देतात. काही जण अनेकदा बनावट घरभाडे पावती जोडतात, पण आता असे करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. कारण आता ITR भरताना, बनावट घरभाडे पावती असल्यास आयकर विभाग थेट नोटीस पाठवू शकतो.तुमची चौकशी होऊ शकते. 

Income tax new slab

जर तुम्ही पगारी नोकरदार असाल तर एचआरएचा फायदा उठवू शकता. पण एचआरए मधून कर बचत केवळ जुन्या कर व्यवस्थेतच मिळते.नवीन कर व्यवस्थेत कर सवलतीसाठी HRA चा लाभ घेता येत नाही.

प्राप्तिकर अधिनियमाची कलम 10 (13A) अंतर्गत घरभाडे कर सवलत मिळते. HRA च्या माध्यमातून कर बचत करता येते. पण त्यासाठी काही अटी आहेत. मेट्रो शहरात मुळ पगाराच्या 50 % हिस्सा तर नॉन मेट्रो शहरात पगाराच्या 40 % हिस्सा एचआरएचा असतो.वार्षिक घरभाडे 10% रक्कम कमी झाल्यानंतर उरलेली रक्कम एचआरएचा भाग आहे.

हे पण पहा ~  ITR File : करदात्यांसाठी मोठी बातमी....आयटीआर फाईल करण्यासाठी आता Form 16 ची गरज नाही

घरभाडे कर सवलत घेताना अशी घ्या काळजी

नोकरदाराला एक लाख रुपयांपर्यंतची HRA च्या माध्यमातून कर बचत करता येते.HRA च्या माध्यमातून कर सवलत मिळवण्यासाठी सर्वात अगोदर रेंट ॲग्रीमेंट करणे आवश्यक असते.करारामध्ये मासिक भाडे,कराराचा कालावधी आणि अंतिम मुदत,खर्च याची माहिती द्यावी लागते.

घरभाडे करारनामा 100 वा 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असणे आवश्यक आहे.जर वार्षिक घरभाडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर घर मालकाचे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

आयकर भरताना 50 हजार रुपये रिबीट कशी घ्यावी येथे पहा

आयकर रिबीट

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment