Old pension : जुनी पेन्शन संदर्भात न्यायालयाने दिले निर्देश! शासन निर्णय निर्गमित दि.5/4/2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old pension : निवृत्तिवेतन धारकांकडून निवृत्तिवेतनविषयक लाभांच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय / महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे याचिका दाखल होत असतात. सदर याचिकामध्ये दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी प्रशासकीय विभागांकडून विहित वेळेत होत नसल्याने प्रस्तुत प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात येत आहेत. 

जुनी पेन्शन योजना अपडेट्स

वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०२/०७/२०१५ अन्वये दिनांक ०१/०९/२०१५ नंतर प्रत्येक निवृत्तिवेतन प्रकरण ऑनलाईन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. 

सेवार्थ वगळता अन्य वेतनप्रणालीमधून निवृत्तिवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयास सादर करताना, ऑनलाईन सादर करणे अनिवार्य करण्यात आली आहे.आता तीन महिन्याच्या आत संबंधित प्रणालीमध्ये योग्य तो बदल करुन निवृत्तिवेतन प्रकरणे ऑनलाईन सादर करावीत.

हे पण पहा ~  Old pension : आता 'या' राज्यातील उर्वरित निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू!

Old pension new updates

सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, ज्या सेवानिवृत्तिविषयक लाभ देण्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील संबंधित तरतूदींच्या विरोधात आदेश पारीत झाले आहेत.

अशा प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्तिवेतन प्रकरण संबंधित प्रशासकीय विभागाच्या सहमतीनेच महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहे.

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “Old pension : जुनी पेन्शन संदर्भात न्यायालयाने दिले निर्देश! शासन निर्णय निर्गमित दि.5/4/2023”

Leave a Comment