Employees DA hike : वाढीव महागाई भत्ता संदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल महिन्याचे वेतन त्याचबरोबर पेन्शन सोबत वाढीव 4% टक्के महागाई भत्ता प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे.
Government employees
राजस्थान सरकारने तेथील कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ दिली.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता केंद्र शासनाच्या धर्तीवर चार टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून तयार झाला असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच एक निर्णय घेतला जाणार आहे.म्हणजे आगामी काही दिवसात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
वित्त विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.या अगोदरच सर्व विभागाकडुन सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता आवश्यक निधींची तरतुद करण्याकरीता मागणी सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागु करण्याकरीता आवश्यक निधीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
Dearness allowance news
केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पासून महागाई भत्ता 4% वाढ होणार आहे.
राज्य शासनाकडून आवश्यक असणारी निधींची तरतुद राज्याच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये नमुद करण्यात येणार आहे.यामुळे राज्यातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 42 % होणार आहे.
खुशखबर..जुन्या पेन्शन संदर्भात न्यायालयाने दिला महत्त्वाचे आदेश