Gov employees updates : जुनी पेन्शन, सेवानिवृती वय 60 वर्ष, महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन! लवकरच मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employees updates : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून जुनी पेन्शन योजना आणि सेवा निवृृत्ती वय वर्ष 60 यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत

सरकारी कर्मचारी अपडेट्स

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्च 2023 रोजी संप पुकारला होता यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 14 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक अभ्यास समितीची स्थापना केली होती.सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला होता.

सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन, शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join whatsApp Group

आता या संदर्भात राजपात्रित अधिकारी संघटना, सरकारी कर्मचारी संघटना व मुख्य सचिव यांच्या दरम्यान एक महत्त्वाची बैठक दिनांक 22 जून रोजी उपस्थितीत पार पडणार आहे. यामध्ये जवळपास 18 लक्ष कर्मचाऱ्यांचे बैठकीकडे लक्ष लागलेले आहे.

हे पण पहा ~  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी... पगारात होणार चक्क 44% पेक्षा जास्त वाढ? || Government employees 7th pay

DA hike old pension Retirement age

बैठकीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे त्याचबरोबर सेवानिवृती वय वर्ष 60 करणे,केंद्राप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 42% दराने लागू करण्यात यावा या सर्व मागणीचा समावेश असणार आहे त्यामुळे आता लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी न्याय मिळेल याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

आता येत्या 22 जून रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक होणार आहे.

Government employees news

बैठकीसंदर्भात अधिक माहिती देताना महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे म्हणाले की, राज्याच्या सेवेतील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रश्न हे सरकार व प्रशासनाशी चर्चा विनिमिय व सौहार्दाच्या वातावरणात सोडवण्याचे महासंघाचे धोरण आहे.

पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत अनेक प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाचा पुढील कृती आराखडा निश्चित होईल, असे ग.दि. कुलथे म्हणाले आहे.

जुनी पेन्शन अभ्यास समिती मुदत संपली,अहवाल संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स येथे पहा

Good News

This article written by Godawari Ghuge from Maharashtra.She is owner of the swaragauri.com and She has 3 Year experience of blogging.

6 thoughts on “Gov employees updates : जुनी पेन्शन, सेवानिवृती वय 60 वर्ष, महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन! लवकरच मोठा निर्णय”

  1. १४ मार्च २०२३ लागू समिती स्थापन केली आहे तेव्हा पासून जे निवृत्त झाले आहेत त्या सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले पाहिजे.

    Reply
  2. १४ मार्च २०२३ ला समिती स्थापन झाली आहे तरी त्या दिवसापासून जे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना पण पुन्हा सेवेत सामावून घेतले पाहिजे ही विनंती

    Reply
  3. जे निवृत्त झालेले आहेत त्यांना परत सेवेत घेतले पाहिजे.

    Reply
    • केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष झाले पाहिजे.

      Reply
  4. केंद्रीय कर्मचारी तसेच इतर 25 राज्याप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे झाले पाहिजे झाले पाहिजेत

    Reply

Leave a Comment