Mudara lone yojana: मिळवा 5 लाख ते 10 लाखा पर्यंत कर्ज! पहा पात्रता व लगेच अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टर नुसार स्कीम बनवली जाते. प्रत्येक सेक्टर मध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील. मुद्रा बँक ही RBI नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराल मुद्रा कार्डदिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

मुद्रा कार्ड म्हणजे काय?

मुद्रा कार्ड हे मुद्रा कर्जदारांना त्यांच्या व्यवसायाची आणि वर्किंग भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जारी केलेले डेबिट कार्ड आहे. एकदा मुद्रा कर्ज मंजूर झाल्यानंतर, बँक/कर्ज देणारी संस्था कर्जदारासाठी मुद्रा कर्ज खाते उघडते आणि त्यासोबत डेबिट कार्ड जारी करते. कर्जाची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित केली जाते जी कर्जदार त्याच्या व्यवसायाच्या गरजेनुसार भागांमध्ये किंवा टप्या-टप्याने काढू शकतो.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े

 • देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य
 • वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा
 • २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ
 • सिडबीची ही उपकंपनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार
 • सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक

आवश्यक कागदपत्रे

 1. पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह रीतसर भरलेला अर्ज
 2. अर्जदार आणि सह-अर्जदारांची KYC कागदपत्रे: पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, युटिलिटी बिल (पाणी/वीज बिल)
 3. विशिष्ट श्रेणीतील अर्जदाराचा पुरावा म्हणजे SC/ST/OBC/अल्पसंख्याक (लागू असल्यास)
 4. मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 5. व्यवसायाचे स्थान, पत्ता आणि कार्यान्वित असलेल्या वर्षांची संख्या, लागू असल्यास पुरावा
 6. बँक किंवा NBFC द्वारे आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज
हे पण पहा ~  State employees : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्त्वाचे शासन निर्णय निर्णय निर्गमित! शासन निर्णय दि.8/5/2023

तीन प्रकारची कर्जे

शिशु लोन : शिशु लोन अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

२-किशोर लोन: किशोर कर्ज प्रकारात ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

३-तरुण लोन: तरुण कर्ज प्रकारात ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजना पात्रता

 • सर्व नॉन-कृषी उपक्रम
 • सूक्ष्म उपक्रम आणि लघु उद्योग या क्षेत्रांतर्गत
 • उत्पन्न निर्मिती क्रियाकलाप संबंधित
 • उत्पादन, व्यापार आणि सेवा संबंधित आणि
 • ज्यांच्या कर्जाची आवश्यकता रु. 10.00 लाखांपर्यंत”
 • आता 01/04/2016 पासून PMMY अंतर्गत संलग्न कृषी उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक बाबी

1. कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.

2. कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही

3. स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.

4. हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.

5. वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत

6. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.

मुद्रा लोन योजना येथे अर्ज करा

मुद्रा लोन योजना

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment