Retirement age : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रलंबित असून शासनाकडून या मागणीवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार!
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृती वयाच्या बाबतीत खूप दिवसापासून मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आंदोलनात ही महत्वाची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबत आश्वासन दिले होते.सध्या आयएएस,आयपीएस आणि राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय यापूर्वीच 60 करण्यात आले आहे.
पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार
निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना चौदा लाखापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो.परिणामी 60 हजार कर्मचाऱ्यांसाठी सरकारवर दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी… घरभाडे भत्ता वाढला
Employee’s Retirement Age news
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण 17 लाख संख्या आहेत. त्यातील दरवर्षी 3% कर्मचारी निवृत्त होतात.राज्य सरकारी सेवेत नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा 31 ते 43 वर्षे इतकी आहे.परिणामी राज्य कर्मचाऱ्यांना नोकरीसाठीचा कार्यकाल कमी मिळतो.
जुन्या पेन्शन साठी होणार फायदा
कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करावे असा सल्ला दिला जातो आहे.तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सेवानिवृत्तीचे वय जर 65 वर्षे केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ घेण्यापूर्वी तब्बल 7 वर्षे सेवेत रहावे लागणार आहे.परिणामी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लगेच द्याव्या लागणाऱ्या खर्चांमध्ये तब्बल 20 टक्क्यांची बचत होऊ शकते.
Kadhi honar g r kadhi nighnar