RTE Admission 2023 : आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी मिळाली मुदतवाढ;लगेच करा ‘येथे’ ऑनलाईन अर्ज

RTE Admission 2023 : शिक्षण हक्क कायद्या 2010 नुसार ग्रामीण व शहरी भागातील वंचित घटकांसाठी खासगी शाळांमध्ये 25 % मोफत प्रवेश दिला जातो.आरक्षित जागांसाठी 1 मार्च 2023 पासून RTE Admission 2023 सुरू झालेल्या प्रक्रियेत सर्व्हर प्रॉब्लेम येत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे.

RTE Admission Date Extended

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशासाठी RTE Admission process 2023 ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आता वाढवण्यात आलेली आहे.आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली होती.

बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार (Right To Education) राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया “RTE Admission process 2023” बुधवारी 1 मार्च 2023 पासून सुरू झाली होती.

यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली असून प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आणि कार्यवाहीची देण्यात आली आहे.

RTE Admission timetable 2023

संदर्भातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मध्ये सुरुवात झाल्यापासून पालकांना सर्वर प्रॉब्लेम येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता आले नाहीत.आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज करण्यासाठी 1 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात झाली होती.पालकांना आता 25 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

लॉटरी कधी निघणार?

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल.25% आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

हे पण पहा ~  Education news : आता राज्यातील या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश! शासन निर्णय दि. 8/6/2023

मोफत शाळा प्रवेश 2023 साठी पात्रता निकष येथे पहा

RTE Admission

RTE Administration 2023 Documents

आरटीईसाठी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक असणार?

RTE admission 2023 साठी खालील विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकाना सादर करावी लागणार आहेत.आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यातयातील खालील एक पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे.

  • ड्रायव्हिंग लायसन्स,
  • आधार कार्ड,
  • घरपट्टी,
  • मतदान ओळखपत्र,
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • जन्मतारखेचा पुरावा,
  • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा,
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा
  • वार्षिक उत्पन्नाचा पुरावा,
  • अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे,
  • विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा

👉RTE Administration 2023 ऑनलाईन अर्ज येथे करा👈

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

%d