Employee Strike : कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Employee Strike : राज्य सरकारी कर्मचारी आपल्या संपावर ठाम असून जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करा नाहीतर बेमुदत संप करू अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.राज्य कर्मचाऱ्यांचा हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाकडून तयारी जोरात सुरू झाली आहे.

जुनी पेन्शन योजना अंदोलन अपडेट्स

कर्मचारी संपावर गेल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच अनेक कामे प्रलंबित आहेत. मार्चमुळे वसुली ठप्प झाली आहे.अधिकारी कार्यरत असून, कर्मचाऱ्यांअभावी अधिकारी कार्य करू शकत नसल्याचे चित्र आहे.अनेक जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी सुरू केली आहे.

परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,या आशयाची नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांना दिले आहे.मात्र,नोटीस बजावणारा व घेणारा,यासोबतच सर्व कर्मचारीसंपात असल्याने नोटीस बजावणार कशी,हा पेच विभाग प्रमुखांसमोर निर्माण झाला आहे.

हे पण पहा ~  OPS latest News : धक्कादायक... जुन्या पेन्शन संदर्भात आतली महिती उघड! कर्मचाऱ्यांना मोठा झटका

Government employees news

सर्व कर्मचारी संपात असल्याने नोटीस कशी बजावावी,हा पेच निर्माण झाला आहे.त्यामुळे नोटीस कर्मचारी सूचना फलक किंवा त्यांचे व्हॉट्सॲप,मेल किंवा त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर जिल्हा परिषद महासंघ समितीच्या निर्णयानुसार विविध विभागांच्या संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसाठी हा संप पुकारला आहे.

ओपीएस महाराष्ट्र अपडेट्स

जिल्हा उपनिबंधक कार्यालय,जिल्हा माहिती कार्यालय, मस्त्य विभाग, बांधकाम विभाग,जलसंपदा विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, आरोग्य कर्मचारी, शिक्षक कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे.

जुनी पेन्शन संदर्भात लेटेस्ट माहिती येथे पहा

जुनी पेन्शन अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment