land record : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land record : बऱ्याचदा जमिनीच्या मालकी हक्काविषयी अनेक वाद निर्माण असतात.संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे,हे सिद्ध करण्यासाठी जमिनीसंबंधीचे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणे गरजेचे असते.असे पुरावे नेमके कोणते आहेत ? याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

Agriculture Land record

1) सातबारा उतारा (Satbara Utara)
शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे.गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे,त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे सर्व नमूद केलेले असते.
2) खरेदी खत (Registry of agriculture land)

जमिन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद अवश्य पाहिला जातो.तो म्हणजे खरेदी खत खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.

हे पण पहा – अशी करा 100 रुपयांच्या स्टॅंमपेपर वर जमीन नावावर

3. खाते उतारा किंवा 8-अ

एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते.या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर असलेली एकूण जमीन पाहता येते.8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे,याची एकत्र माहिती कळते.

4) फेरफार उतारा (Mutation Utara)

जमीन खरेदी केल्यानंतर जमिनीचा फेरफार केला जातो.फेरफार उतारा हा महत्त्वाचा महसूल पुरावा आहे.फेरफार नोंदीवर जमीन खरेदी केलेल्या दिनांक, घेणार, देणार, व्यवहार झालेली रक्कम इ नोंदी असताना. फेरफार उतारा आता ऑनलाईन सुध्दा काढता येतो.

हे पण पहा ~  Land record : वर्षानुवर्षे च्या जमीनीचे वाद मिटवा फक्त 2 हजार रुपयात! पहा पात्रता अटी आणि GR

Digital land record

5.जमीन मोजणीचे नकाशे 

जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते.यावेळी जमीन मोजणीचे नकाशे तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो.
6.जमीन महसूलाच्या पावत्या 

दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत दिली जाणारी पावती,हासुद्धा जमिनीच्या मालकी हक्काबाबत महत्तावाचा पुरावा ठरू शकतो.पिक विमा भरलेल्या पावत्या,पिक कर्ज इ.पुरावे पण महत्त्वाचे असतात.
7. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले

एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्रे, त्यातील जबाबाच्या प्रती, निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे.

हे पण पहा – आपल्या प्रॉपर्टीचे 1980 पासूनचे जुने पुरावे लगेच 2 मिनिटात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

8. प्रॉपर्टी कार्ड (Property card)

बिगरशेती जमिनीवर तुमची मालमत्ता असेल तर त्याच्या मालकी हक्काविषयीही जागरूक राहणं आवश्यक असते. बिगरशेतजमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागद म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय.

डिजिटल सातबारा, फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment