7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होऊन तो 42% झाला आहे.आता या पार्श्वभूमीवर खालील राज्य सरकारी कर्मचारी,निवृत्तीवेतनधारक आणि महिलांना मोठी भेट दिली आहे.महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे.
7th pay commission new updates
आता हिमाचल प्रदेश राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 % महागाई भत्ता मिळणार असून जो पूर्वी 31 % होता. निर्णयाचा फायदा सुमारे 2.15 लाख आणि 1.90 लाख यांना होणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू सुखू यांनी आज सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 3 % वाढ जाहीर केली आहे.
वेतन आयोग महागाई भत्ता वाढ
राज्य सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून जुनी पेन्शन लागू केली आहे. यानंतर, सरकारने महागाई भत्ता/महागाई सवलत (DA/DR) ची भेट दिली आहे.1 जानेवारी 2022 पासून सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळेल.तर महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणाही सरकारने केली होती.
Employees DA hike Arrears
हिमाचल सरकारच्या वतीने महागाई भत्ता जाहीर करताना राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 3 % अतिरिक्त महागाई भत्ता (डीए) मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
मुख्य सचिवांनी एक अधिसूचना जारी करुन म्हटले आहे की,1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता (डीए वाढ) सध्याच्या 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला आहे.सरकारचा आदेश अखिल भारतीय सेवा, हिमाचल प्रदेश न्यायिक सेवा आणि UGC संवर्गांतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू होईल.
महागाई भत्ता लवकरच होणार 50% पहा आकडे