7th pay Arrears : दिनांक ०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे.
निवृत्तिवेतनधारकांना दिनांक ०५.०२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या मूळ निवृत्तिवेतनावर सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देय करण्यात आलेला आहे.
सातवा वेतन आयोग फरक 2023
दिनांक ०७.११.२०२२ च्या शासन परिपत्रकान्वये सुधारित अंशराशीकरणाचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयास सादर करण्यास दिनांक ३१.१२.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
अद्यापही दि. ०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित अंशराशीकरणाचे लाभ देण्याची कार्यवाही अनेक प्रकरणांमध्ये प्रलंबित आहे.
सातवा वेतन आयोग फरक शासन निर्णय येथे पहा – शासन निर्णय
अशा प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास लागणारा कालावधी विचारात घेता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित न झालेले अंशराशीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यास दि. ३१.१२.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फरक पहा सविस्तर