DA Hike News : नुकतेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग अंतर्गत कोळसा कामगारांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.(7th pay commission) आता त्यांचा महागाई भत्ता 42.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Dearness allowance Hike News
दुसरीकडे,केंद्रीय कर्मचारी अजूनही महागाई भत्त्याच्या वाढीच्या प्रतीक्षेत आहेत (Dearness allowance Hike News ).15 मार्च रोजी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर होण्याची शक्यता होती.पण मंत्रीमंडळ बैठकीमध्ये न झाल्याने कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली नव्हती.
वित्त मंत्रालय जाहीर करणार अधिसूचना
बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही.पण आता शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.यामध्ये 4 % महागाई भत्ता वाढ मंजूर करण्यात येणार आहे.त्यानंतर अर्थ मंत्रालय त्याची अधिसूचना जारी करेल.
अधिसूचना जारी होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगारात 4 टक्के वाढीसह महागाई भत्ता देण्यात येणार आहे. यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांची थकबाकी देण्यात येणार आहे.
1 मार्च रोजी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीमध्ये DA hike करण्यास मंजुरी मिळाली आहे. पण अद्याप याबाबात केंद्राकडून कोणतेही परिपत्रक काढण्यात आले नाही.तसेच कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
जुनी पेन्शन लागू होणार! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांची तातडीची बैठक
राज्य कर्मचाऱ्यांना पण तात्काळ महागाई भत्ता वाढ!
राज्य कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत.आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम केला आहे.
केंद्र सरकारने (DA hike news) वाढीचा निर्णय घेतल्या बरोबर राज्य सरकारकडून 4 % महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे.
महागाई भत्ता वाढीने पगारात होणारी वाढ येथे कॅल्क्युलेट करा
👇