Old Pension : जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावरुन राज्यातील तब्बल 14 लाख कर्मचारी (Maharashtra Government Employees) संपावर ठाम आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संटनेने याबद्दल इशारा दिला आहे.त्यामुळे येत्या 14 मार्चला 14 लाख कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.
जुन्या पेन्शन संदर्भात तातडीची बैठक
सरकारी-निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मागण्यांबाबतचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी निवेदन दिले आहे.सदर निवेदनात राज्य सरकारी कर्मचारी-शिक्षकांच्या मागण्यांसाठी दि 14/2023 रोजी पासून बेमुदत संप आंदोलन पुकारणार असल्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
मा. मुख्य सचिव महोदय यांचे समवेत आज दिनांक 10/03/2023 रोजी दुपारी 12 वाजता,बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ठरल्या नुसार सदर संघटने सोबत सोमवार दिनांक 13/03/2023 रोजी सकाळी 11 वाजता मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स महाराष्ट्र
उद्या अर्थातच 13 मार्च 2023 रोजी ही बैठक संपन्न होणार असून या बैठकीसाठी विरोधी पक्ष नेत्यांना देखील आमंत्रण गेल आहे. एका वृत्तसंस्थेला वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2004 मध्ये बंद करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना निश्चितच राज्याच्या दृष्टीने अहितकारी आहे.
सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राजकीय दृष्ट्या विचार केला तर जुनी पेन्शन योजना “old pension scheme” लागू करणे राज्य शासनाला अशक्य नाही.जुनी पेन्शन योजना आता लागू केली तरी सुरुवातीचे 8 ते 10 वर्षे राज्य शासनाच्या तिजोरीवर भार जाणवणार नाही.
Old Pension Maharashtra updates
जुनी पेन्शन योजना बाबत (OPS) आमचे सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाबतीत लवकरच राज्य सरकार चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रालय बैठक संबंधित पत्रक येथे पहा
4 thoughts on “Old pension: मोठी बातमी…सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याची शक्यता; मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अन् विरोधी पक्ष नेत्यांची तातडीची बैठक”