जुनी पेन्शन योजना : राजस्थानसह अनेक राज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू केल्यामुळे सध्याच्या नियमांतर्गत नवीन पेन्शन योजनेत (एनपीएस) जमा केलेले पैसे राज्य सरकारांना परत मिळणार नसल्याचे केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
DCPS NPS latest news
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नवीन पेन्शन योजनेसाठी (NPS) मध्ये जमा रक्कम राज्य सरकारांना देण्यास नकार दिला.अर्थमंत्री म्हणाल्या की,”जर कोणत्याही कारणास्तव NPS Amount केंद्राकडून घेतला जाऊ शकतो असे कोणत्याही राज्याने ठरवले तर ते उपलब्ध होणार नाही.”
Old pension updates
राजस्थानने नुकतीच आपल्या राज्य कर्मचार्यांसाठी ओ पी एस ची घोषणा केली होती.तर काँग्रेस सरकारने हिमाचल प्रदेशातही old pension ची घोषणा केली आहे.अर्थमंत्र्यांच्या ताज्या घोषणेमुळे या जुन्या पेन्शन योजनेला मोठा धक्का बसणार आहे.
सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा
राजस्थान सरकार जाणार कोर्टात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नुकतेच सांगितले होते की,सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी शेअर बाजारावर अवलंबून राहू शकत नाही,जेथे नवीन पेन्शन योजनेतील पैसे गुंतवले जात आहेत.गेहलोत म्हणाले, ओपीएस लागू करूनही पैसे देण्यास नकार दिला जात आहे.आम्ही पैसे न दिल्यास न्यायालयात जाऊ.
जुनी पेन्शन लागल्यास NPS मधील पैसे केव्हा परत मिळणार येथे पहा
1 thought on “जुनी पेन्शन योजना : धक्कादायक… जुनी पेन्शन लागली तरी मिळणार नाही ‘ही’ रक्कम”