Income tax calculator : भारीच.. आयकर विभागाचे टॅक्स कॅल्क्युलेटर आले; आपल्याला किती टॅक्स बसतो पहा 2 मिनिटांत मोबाईल वर

Income Tax calculate : आपला इन्कम टॅक्स  काढण्यासाठी,चार्टर्ड अकाउंटंटला भेट देण्याची गरज नाही.आयकर विभागाकडून ऑनलाइन इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटरद्वारे आयकर मोजण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Income Tax Calculate 2022-23

कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सीटीसीमध्ये मूळ वेतन (Basic Salary),घरभाडे भत्ता (HRA), महागाई भत्ता (DA), व्हेरिएबल पे, रिएंबर्समेंट (Reimbursement), प्रवास भत्ता (LTA), वैद्यकीय भत्ता, बोनस,भविष्य निर्वाह निधी (PF) आणि अन्न भत्ता यांचा समावेश होतो.

इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न 

  • पगारातून मिळकत (तुमच्या मालकाने दिलेला पगार)
  • घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न (कोणतेही भाड्याचे उत्पन्न जोडा किंवा गृहकर्जावर भरलेले व्याज समाविष्ट करा)
  • भांडवली नफ्याचे उत्पन्न (शेअर किंवा घराच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न)
  • व्यवसायातून उत्पन्न (फ्रीलान्सिंग किंवा व्यवसायातून मिळकत)
  • इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न (बचत खात्यावरील व्याजाचे उत्पन्न, मुदत ठेवीवरील व्याजाचे उत्पन्न, रोख्यांचे व्याज उत्पन्न)

सरकारी कर्मचारी, शासन निर्णय, पगार, महागाई भत्ता, शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp Group

Income Tax new slabs 2022 – 2023

आर्थिक वर्ष 2022-23 साठी कररचना पुढीलप्रमाणे

Old income Tax slabs (जुनी कर प्रणाली)

  • 0 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नोकरदार करमुक्त असतील.
  • 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 5 %
  • 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10 % 
  • 7.5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 15 %
  • 10 ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20 %
  • 12.5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25 % 
  • 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30 % 
हे पण पहा ~  Income Tax भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी... रिटर्न भरण्याच्या प्रक्रियेबाबत मोठी अपडेट्स

जर तुम्ही फेब्रुवारी 2020 पुर्वी जाहीर केलेल्या जुन्या कर स्लॅब दरांनुसार गेल्यास,कलम 80C गुंतवणूक घरभाडे भत्ता गृहनिर्माण कर्जाचे व्याज वैद्यकीयविमा प्रीमियम प्रवास भत्ता वजावट,बचतबँक व्याज,शैक्षणिक कर्ज व्याज इ. 

New income Tax slabs (नवीन कर प्रणाली) 

आर्थिक वर्ष 2022-2023 साठी नवीन कर रचना पुढील प्रमाणे आहे.

  • 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 0 %
  • 5 लाख ते 7.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10%
  • 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 15 %
  • 10 लाख ते 12.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20%
  • 12.5 लाख ते 15 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25%
  • 15 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30%

आपल्याला किती टॅक्स बसणार येथे कॅल्क्युलेट करा

Income tax calculator

Hello Everyone,my name is Swati Ghuge Maharashtra. I am the Writer and Founder of this blog and share all Marathi information Related Education, Gov Employees, Scholarship, Gov Schemes & Educational update etc.I have 3 years experience in blogging and youtube careers.

1 thought on “Income tax calculator : भारीच.. आयकर विभागाचे टॅक्स कॅल्क्युलेटर आले; आपल्याला किती टॅक्स बसतो पहा 2 मिनिटांत मोबाईल वर”

Leave a Comment

%d