HRA Hike : राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता व फरक रोखीने

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HRA hike : राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता व फरक रोखीने मिळणार असून त्यासंदर्भात मोठी अपडेट्स समोर आली आहे.पाहूया सविस्तर

Employee’s HRA New Updates

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील आणि राज्य सरकारी कर्मचारी असलेले जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी 27% ची घर भाडे वाढ करण्यात आली होती. 2021 पासून ते सप्टेंबर 2021 पर्यंत घर भाडे भत्त्याची फरकाची रक्कम म्हणजेच HRA Arrears राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित होते, पण ही 27 % ची वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना (government employees) प्रत्यक्षात मिळालेली नव्हती. तसेच, शासनाने निर्णय केला होता.

त्याबाबतचे आदेशही पारित झाले होते.पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती.राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही दोन वर्षांपूर्वीची थकीत घरबाकीची रक्कम मिळावी, यासाठी अनेकदा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.

HRA hike news

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ वेतन प्रणाली मध्ये फरक (HRA Arrears) काढण्याचा टॅब उपलब्ध नसल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना घरभाडे ‘home rent allowance’ भत्ता फरकाच्या रकमेपासून वंचित ठेवण्यात आले होते.पण आता शिक्षण विभागाच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी वाढवण्यात आलेला घरभाडे भत्ता फरक रक्कम संबंधित शिक्षकांना वर्ग करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण पहा ~  खुशखबर... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची तारिख ठरली! पहा लेटेस्ट अपडेट्स || State employees DA news

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता शैक्षणिक राजकीय क्षेत्रांशी संबंधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हॉट्सअप गृप नक्की जॉईन करा

Join WhatsApp group

HRA Calculations

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central government employees) घरभाडे भत्ता (HRA) तीन श्रेणींमध्ये दिला जातो.तो X,Yआणि Z श्रेणींमध्ये विभागलेला आहे.7th pay commission अंतर्गत ‘X’ म्हणजे 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा X श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.

‘Y’ म्हणजे 5 लाख ते 50 लाख लोकसंख्या असलेले क्षेत्र होय.Y श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 % आणि जेथे लोकसंख्या 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 8% दराने घरभाडे भत्ता दिला जातो.

शेवटी सरकारने घेतला कर्मचारी हा हिताचा निर्णय

सरकारी कर्मचारी अपडेट्स

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

2 thoughts on “HRA Hike : राज्यातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार घरभाडे भत्ता व फरक रोखीने”

Leave a Comment