7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन संदर्भात मोठे अंदोलन आज मागे घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यासाठी राज्य शासनाने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती केलेली आहे.तासिका तत्वावर शिकवणाऱ्या या अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली जात होती.
या कर्मचाऱ्यांच्या मानतात मोठी वाढ!
मानधन वाढीच्या मागणीचा विचार करुन त्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अध्यापकांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे.त्यामुळे त्यांचे मानधन वाढविण्यात आले आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे सांगितले.
Government employees news
- उच्च शिक्षण संचालनालय – कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता 625 रुपयांवरून 1 हजार प्रति तास
- पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 750 रुपयांवरून 1 हजार प्रति तास.
- शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता 750 रुपयांवरून 1 हजार प्रति तासतास
- तंत्र शिक्षण संचालनालय – उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान 1 हजार रुपयांवरून 1 हजार 500 प्रति तास
- पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन 600 रुपयांवरून 1 हजार प्रति तास
- पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन 500 रुपयांवरून 800 रु. प्रति तास.
- कला संचालनालय – उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर 750 वरुन 1 हजार 500 प्रति तास
- कला शिक्षण पदविका – पदवी / पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन 625 वरुन 1 हजार रुपये प्रति तास
सरकारी कर्मचाऱ्यांना पाडव्याच्या मुहुर्तावर मिळणार मोठे गिफ्ट
1 thought on “7th pay commission : जुनी पेन्शन नाही पण ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली मोठी वाढ!”