State employees : राज्यातील केंद्र प्रमुख भरती प्रक्रीये संदर्भात दि.०१.१२.२०१२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखांची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० % पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या काट्याच्या मर्यादित भरण्यात येणार आहे.
केंद्रप्रमुख पदोन्नती शासन निर्णय 2023
दिनांक ०९/०३/२०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर -शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण कली असेल अशा उमेदवारामधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.असे निर्देश आहे.
०१/१२/२०२२ पूर्वी केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात निघालेल्या सर्व शासन निर्णय/शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करून दि. ०१.१२.२०१२ रोजीचा शासन निर्णय अंतिम करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयात विषया संबंधित कोणताही उल्लेख केलेला नाही.
सरकारी कर्मचारी, पगार,महागाई भत्ता,जुनी पेन्शन,शासन निर्णय,शैक्षणिक राजकीय क्षेत्राशी संबंधित माहितीसाठी आमचा व्हाट्सअप गृप नक्की जॉईन करा
शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२२ नुसार प्रदोशती करीता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहत.. त्यामुळे शासन निर्णय दिनांक ०१ / १२ / २०२२ व शासन शुद्धिपत्रक दि.०१/०३/२०२३ अन्वये नियमानुसार पदोन्नती विषयक कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षक बदली 2023
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे.सदर धोरणानुसार सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आलेली आहे.
कर्मचारी बदली व केंद्र प्रमुख भरती सविस्तर माहिती येथे पहा
सदर प्रक्रीया राबविताना विविध शिक्षक संघटनाकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता, सन २०२३ साठी आंतरजिल्हा / जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा सुचविण्याकरिता दि. १४.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे.
अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार दि.०७.०४.२०२१ रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरु आहे.
महागाई भत्ता 4 % वाढ! पहा DA वाढ फरक किती मिळणार 2 मिनिटात मोबाईलवर