DA Hike 2023 : सरकारी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी मिळणार हे मोठे गिफ्ट!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike 2023 : १ जुलैपासून केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३-४ टक्के वाढ केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचा-यांना दिल्या जाणा-या महागाई भत्त्याचा वर्षातून दोन वेळा आढावा घेतला जातो. याचा लाभ केंद्रीय कर्मचा-यांना मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचा डीएत होणार मोठी वाढ

केंद्र सरकारने मार्च २०२३ मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला होता. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती.  सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळतो. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) ने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की मोदी सरकार पुन्हा एकदा जुलै महिन्यात महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. सरकार ही वाढ सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जाहीर करेल पण ती 1 जुलैपासून लागू केली जाईल. 

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की AICPI च्या आकडेवारीनुसार,महागाई भत्त्यात मोठी वाढ असणे निश्चितच आहे.अहवालानुसार,जूनमध्ये AICPI चा आकडा 129.2 होता.यानंतर फेब्रुवारीत तो घसरून 132.7 अंकांवर पोहोचला. मार्चमध्ये तो पुन्हा उसळला असून तो 133.3 अंकांवर पोहोचला आहे.

हे पण पहा ~  Scholarship exam : उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती रक्कमेत मोठी वाढ! शासन निर्णय दि.3/7/2023

DA hike news 2023

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्याने त्यांच्या पगारातही बंपर वाढ होईल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम येईल. सोप्या शब्दात बोलायचे तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८००० रुपये असेल, तर ३८ टक्क्यांनुसार त्याला ६,८४९ रुपये डीए मिळेल. तसेच महागाई भत्ता ४२ टक्के झाल्यास कर्मचार्‍यांना ७,५६० रुपये डीए मिळेल म्हणजेच त्याला ७२० रुपये अधिक मिळतील आणि वर्षानुसार ८,६४० रुपयांचा फायदा होईल. 

Dearness allowance news

सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५६ हजार रुपये असेल तर ३८ टक्के दराने महागाई भत्ता २१,२८० रुपये आहे. आणि चार टक्के डीए वाढीनंतर तो २३ हजार ५२० रुपये होईल. म्हणजे २६ हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होणार आहे.महागाई निर्देशांक वाढल्यानंतर महागाई भत्त्यात अपेक्षेप्रमाणे ४ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

आपला महागाई भत्ता किती वाढणार येथे पहा 

DA calculate

This article is written by Swati form Maharashtra.She is famous Youtuber,website developer and Editor of swaragaur.com

Leave a Comment